इंग्लंड : भारताच्या स्मृती मानधनाने इंग्लंडमधल्या टी-20 लीगमध्ये आपला सुपर फॉर्म पुन्हा दाखवून दिला आहे. वेस्टर्न स्टॉर्म्सकडून खेळताना स्मृतीने अवघ्या 60 चेंडूंत शतक झळकावलं. तिच्या या कामगिरीच्या जोरावर वेस्टर्न स्टॉर्म्सने लँकेशायर थंडरवर सात विकेट्सनी विजय मिळवला.
स्मृती सध्या इंग्लंडमधील किया वुमन क्रिकेट सुपर लीग स्पर्धेत स्टॉर्म्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लँकेशायर थंडरविरोधात काल (शुक्रवार) झालेल्या सामन्यात स्मृतीने 61 चेंडूंत 102 धावांची खेळी उभारली. तिच्या या खेळीला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज होता. स्मृतीच्या या आतषबाजीने वेस्टर्न स्टॉर्म्सला 154 धावांचं लक्ष्य 19 व्या षटकांत गाठून दिलं.
इंग्लंडमध्ये होत असलेल्या या सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा तिच्याच नावावर आहेत.
सामन्यात लँकेशायर थंडरने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत सात बाद 153 धावा केल्या होत्या. यात न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेटच्या 83 धावांच्या खेळी केली. तर 154 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृतीच्या 102 धावांच्या खेळीच्या बळावर वेस्टर्न स्टोर्म संघाने 18.3 षटकांत विजय मिळवला.
लँकेशायर थंडरकडून खेळणारी भारताची हरमनप्रीत कौर या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही.
टी-20 लीगमध्ये स्मृती मानधनाचा शतकी झंझावात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2018 01:11 PM (IST)
इंग्लंडमध्ये होत असलेल्या या सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा तिच्याच नावावर आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -