मुंबई : रेल्वे मंत्रालायाने गृप ‘G’ मधील भरती प्रक्रियेत 32 हजार जागांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृप ‘G’मध्ये आता 90 हजार जागांऐवजी तब्बल 1 लाख 32 हजार 646 जागांसाठी भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली.
टेक्नेशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केलं. यासाठीची परीक्षा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “या श्रेणीतील पदांसाठी सेवेच्या खडतर अटी ठेवण्यात आलेल्या असतात. त्यामुळे महिला या पदांसाठी कमी प्रमाणात अर्ज करतात.”
“रेल्वेच्या सुरक्षिततेचा स्तर उंचावण्यासाठी नव्या यंत्रांच्या खरेदीसाठी सात हजार कोटींचा अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. पुढील वर्षी या निधीत 13 हजार कोंटीची वाढही केली जाईल. यामुळे रेल्वे दुर्घटना रोखण्यास मदत होईल,” असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
असिस्टंट लोको पायलट आणि टेक्नेशियन्सच्या जागांतही वाढ
असिस्टंट लोको पायलट आणि टेक्नेशियन्सच्या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या पदांसाठी 26 हजार 502 जागांऐवजी आता 60 हजार जागांची भरती होईल. या पदासाठी तब्बल 48 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
असिस्टंट लोको पायलट आणि टेक्नेशियन्सच्या पदासाठी 9 ऑगस्टला परीक्षा घेतली जात आहे.
‘याआधी भरतीसाठीच्या उमेदवारांना परीक्षेसाठी दूरच्या केंद्रावर जावे लागत. पण आता संगणकआधारे परीक्षा होत असल्याने हा त्रास वाचला,’ असं रेल्वेने म्हटलं आहे.
रेल्वे भरतीत 32 हजार जागांची वाढ, एकूण जागा 1,32,646
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2018 10:31 AM (IST)
प ‘G’मध्ये आता 90 हजार जागांऐवजी तब्बल 1 लाख 32 हजार 646 जागांसाठी भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -