इस्लामाबाद : पाकिस्तान संघ वर्ल्डकपमध्ये (Pakistan) हाराकिरी करून मायदेशी पोहोचताच पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकने (Shoaib Malik)  2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा दावा केला आहे. शोएब मलिक म्हणाला की, जर पाकिस्तानची इच्छा असेल तर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ते माझ्याकडे पाहू शकतात. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात मलिक पाकिस्तान संघाचा भाग नव्हता, पण त्याआधी मलिक 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या ICC T20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसला होता.






शोएब मलिक म्हणाला की, तो अजूनही खेळत आहे. तसेच वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलचा टी-20 क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडायचा आहे. मलिकला T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे सोडायचे आहे. मलिक सध्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.






त्याने सांगितले की, “मी अजूनही खेळत आहे आणि जर पाकिस्तानला 2024 च्या विश्वचषकात माझा विचार करावा, मला ख्रिस गेलचा T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडायचा आहे."


नुकत्याच झालेल्या 2023 लंका प्रीमियर लीगमध्ये मलिक जाफना किंग्जकडून खेळताना दिसला होता. याशिवाय मलिक जगातील अनेक T20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. 41 वर्षीय मलिकने नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो संघात स्थान मिळवू शकला नाही.


ख्रिस गेलच्या T20 मध्ये सर्वाधिक धावा 


ख्रिस गेल टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 463 टी-20 सामन्यांच्या 455 डावांमध्ये 36.22 च्या सरासरीने आणि 144.75 च्या स्ट्राइक रेटने 14562 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 शतके आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. शोएब मलिकने 515 टी-20 सामन्यांच्या 478 डावांमध्ये 36.25 च्या सरासरीने आणि 127.68 च्या स्ट्राइक रेटने 12688 धावा केल्या आहेत. मलिकने 79 अर्धशतके केली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या