Weather Update Today : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate Chnage) होत आहे. बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र आहे. विदर्भात (Vidarbha) येत्या काही दिवसात  थंडीचा (Winter) जोर ओसणार आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील तापमान हे सर्व सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.  

शनिवार दि. 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत विदर्भातील वातावरणात फार बदल होणार नसून वातावरण कोरडे राहणार आहे. मात्र त्यानंतर 23 जानेवारीला पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.   

पूर्व विदर्भात पावसाचा इशारा 

बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरलं आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. त्याचा परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जाणवर असल्याने पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा ढग दाटून येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 23 जानेवारीला तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहे.

गुरुवारी 20 जानेवारीला विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील कमाल तापमान हे 25 अंश सेल्सिअसच्या वर आहे. आज सर्वात कमी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 14 अंश सेल्सिअस हे गोंदिया जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारीपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे सर्वसामान्य अससणार आहे. सोबतच विदर्भातील थंडीचा जोर ओसणार असल्याचा देखील अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. 

असे आहे विदर्भाचे तापमान

जिल्हे            कमाल  किमान
अकोला                   30.2 17.4
अमरावती  30.0 15.7
बुलढाणा          29.4 15.0
ब्रम्हपुरी 31.7 17.5
चंद्रपूर 30.0 15.4
गडचिरोली 30.0 16.4
गोंदिया             26.0 14.0
नागपूर              28.2 17.2
वर्धा                  28.2 16.6
वाशिम              31.2 15.4
यवतमाळ          31.5 16.3

 

व्हायरल रोगांचा वाढता धोका

वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरल इन्फेक्शन आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना त्यांच्या श्‍वसनसंस्थेत समस्या येत आहेत. तसेच हृदयविकाराच्या झटका येणाच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

इतर संबंधित बातम्या