Ayodhya Ram Mandir : साऱ्या देशाचं लक्ष भव्य राम मंदिराच्या (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा पार पडणार आहे. शुभ मुहूर्तावर रामललाचा (Ram Lalla) अभिषेक (Abhishek) आणि प्राणप्रतिष्ठा (Pranpratishtha) होणार असून त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या बालरुपाचं दर्शन घडणार आहे. देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. रामललाच्या (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्सव फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी देण्यात आली आहे.


उत्तर प्रदेश सरकारकडून शासकीय सुट्टी जाहीर


रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात होम-हवन, पूजा आयोजित करण्यात येत आहेत. अयोध्येमध्ये सर्व रामभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. तर खाजगी कार्यालये मात्र सुरु राहणार आहेत. या दिवशी दारुची दुकानेही बंद राहतील.


महाराष्ट्र सरकारकडूनही सुट्टी


महाराष्ट्र सरकारनेही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 22 जानेवारीला शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये तसेच निम-शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


'या' राज्यांमध्येही सुट्टी जाहीर


मध्य प्रदेश आणि हरियाणा 22 जानेवारी सुट्टी देण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. छत्तीसगडमध्येही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असून शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्यात येतील. गोव्यातही या दिवशी सुट्टी शाळा आणि शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येतील.


22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन


22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आणि आनंद देशभर पाहायला मिळणार आहे. 22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ram Mandir : उद्योगपती आणि खेळाडूंसोबतच 'या' सेलिब्रिटींनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण, पाहा संपूर्ण यादी