Shoaib Akhtar on Mohammad Shami : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम लढत होणार आहे. दुबईत रविवारी (दि.7) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी उपलब्ध नव्हता. जखमी झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने चमक दाखवलीये. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार गोलंदाजी केलीये. यादरम्यान, मोहम्मद शमीबाबत अनावश्यक वादाला तोंड फुटलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान, मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. त्यामुळे मोहम्मद शमीने रोजा धरला नसल्याची चर्चा सुरु झाली. 1 मार्चपासून रमजानचा महिना सुरु झालाय. याबाबत एका मौलानांनी शमीवर नाराजी व्यक्त केली होती. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने याबाबत प्रतिक्रिया दिलीये. 




मोहम्मद शमी हा मुस्लिम समाजातील हे सर्वश्रूत आहे. मुस्लिम समाजीतील लोक रमजान महिन्यात उपवास ठेवतात. रमजान महिन्यात उपवास सेहरीने सुरू होतो आणि इफ्तारने संपतो. दरम्यान, रोजा दरम्यान कोणत्याही प्रकारचे अन्न खाण्यास किंवा पाणी पिण्यास पूर्ण मनाई आहे. मात्र, अशा उन्हात खेळताना उपवास ठेवणे कठीण आहे, असं म्हणत अनेक लोकांनी मोहम्मद शमीचं समर्थन केलंय. शमीने आपल्या धर्मापेक्षा देशाला प्राधान्य दिलं, अशी प्रतिक्रिया देखील नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. 


शोएब अख्तर ने शेयर केला व्हिडीओ


पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो व्यायाम केल्यानंतर रिलॅक्स होताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शोएबने कॅप्शन लिहिलंय की,  यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "उपवास हा कोणताही बहाना नाही. ती एक प्रेरणा आहे. तुम्हाला प्रशिक्षण किंवा प्रॅक्टिसपासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही त्याचा (रोजाचा) फायद्यासाठी वापर करा."


मोहम्मद शमीला त्याच्या धर्माप्रती असलेल्या भावना आणि देशाप्रती प्रामाणिकपणा याबाबत कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. एका बाजूला पाकिस्तानचा संघ आहे जो यजमान असूनही चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाल्याच्या पाच दिवसांतच बाहेर पडला. दुसरीकडे, टीम इंडिया सलग तिसरी चॅम्पियन्स फायनल खेळताना दिसत आहे. शमीबद्दल बोलायचे झाले तर त्याने पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Shama Mohamed : रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यानंतर शमा मोहम्मद यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या; 'गणित इस्लामधून आलं'