मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां'ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा सोमवारी करण्यात आली.

2014-15 साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, 2015-16 साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि 2016-17 साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षके विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला. 2014-15 साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे.

पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. 17 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रमुख क्रीडापटू
क्रिकेट : राेहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंकित बावणे

हाॅकी : युवराज वाल्मिकी, देविंदर वाल्मिकी


अॅथलेटिक्स : ललिता बाबर

राेइंग : दत्तू भाेकनळ


टेनिस : प्रार्थना ठाेंबरे

बॅडमिंटन : अक्षय देवलकर

बुद्धिबळ : विदित गुजराती

कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशाेरी शिंदे

वेटलिफ्टिंग : अाेंकार अाेतारी, गणेश माळी

एव्हरेस्टवीर : अाशिष माने

जलतरण : साैरभ सांगवेकर

खाडी किंवा समुद्र पाेहणे : राेहन माेरे

मार्गदर्शक : प्रवीण अामरे

दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव

सर्वाधिक शिवछत्रपती पुरस्कार पुण्याच्या वाट्याला आले असून तीन वर्षांतील पुण्यातील पुरस्कार विजेते :

2014-15 : सविता मराठे, भास्कर भोसले, प्रवीण देशपांडे, रणजित चांबले, सुनील लिमण, मिलिंद झोडगे, अनंत शेळके, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, अक्षयराज कोरे, प्रिताली शिंदे, संतोष घाडगे, शिवानी शेट्टी, तेजश्री नाईक, शिरीन लिमये, पूजा ढमाळ, किशोरी शिंदे, ऐश्वर्या रावडे, गुरुबन्स कौर


2015-16 : मिलिंद पठारे, श्रीपाद शिंदे, प्रवीण बोरसे, ऋचा पाटील, अभिषेक केळकर, ऋतुजा सातपुते, श्रद्धा तळेकर, सलमान शेख, स्नेहल वाघुले, पूजा शेलार, कोमल पठारे, तेजस कोडे, रुपेश मोरे


2016-17 : सोपान कटके, लाला भिलारे, स्वप्निल ढमढेरे, मेघा सुनील अगरवाल, आकांक्षा हगवणे, शशिकांत कुतवळ, अभिमन्यू पुराणिक, कृष्णा काळे, तेजस शिंदे, हर्षद वाडेकर, ओमकार पवार, रोहन मोरे, जयंत गोखले, जोसेफ डिसुजा, अबोली जगताप