नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागेवर शिखर धवनला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
श्रीलंका दौऱ्यासाठी मुरली विजयचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मुरली विजयला दुखापत झाली होती, ज्यातून तो अजूनही सावरलेला नाही.
मुरली विजयला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या मेडीकल टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याच्या जागी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे.
वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल.
श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत जाणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ :
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.
मुरली विजय श्रीलंका दौऱ्यातून आऊट, शिखर धवनला संधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2017 10:43 AM (IST)
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागेवर शिखर धवनला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -