पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.


रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. पीडित महिला आणि रोहित टिळक यांची दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि मारहाण केल्याचं पीडित महिलेनं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात पीडित महिलेनं याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. अखेर काल तिने विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या तपास सुरु आहे.

रोहित टिळक यांनी २००९ आणि २०१४ साली गिरीश बापट यांच्याविरुध्द कसबा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.