मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत खेळू शकेल का, याविषयी शंका निर्माण झाली आहे.


टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली कसोटी पाच जानेवारीपासून सुरु होत आहे. धवनच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात घेता तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही, हे नक्की आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यासाठी आज मुंबईत एकत्र आला आहे. त्या वेळी धवनला लंगडत चालताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवन भारतीय संघासोबत रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकाला रवाना होणार आहे.

दुसरीकडे द. आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डिकॉक हा देखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो देखील पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.