कोलंबो : मूळचा मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरनं श्रीलंकेविरुद्ध कोलंबो वन डेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण शार्दूलचं पदार्पणातच कामगिरीपेक्षा त्याच्या जर्सी क्रमांकामुळं चर्चेत आला आहे.
वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं वापरलेल्या दहा क्रमांकाच्या जर्सीचा मान शार्दूल ठाकूरला देण्यात आला आहे. सचिन 23 डिसेंबर 2012 रोजी आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळून वन डे क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर त्याची दहा क्रमांकाची जर्सी टीम इंडियाच्या एकाही शिलेदारानं परिधान केली नव्हती.
आज साडेचार वर्षांनी शार्दूलला दहा क्रमांकाच्या जर्सीचा बहुमान देण्यात आल्यावर करोडो भारतीय क्रिकेटरसिकांना त्याचं आश्चर्य वाटलं. सचिनच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.