नवी दिल्ली : आरबीआयच्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर बाद झालेल्या चलनापैकी 99 टक्के नोटा परत आल्यात, त्यामुळं देशात 1 टक्केच काळा पैसा होता का? असा सवाल उपस्थित होतो आहे. तर नोटाबंदीमुळं 3 लाख कोटी काळा पैसा बँकेत जमा होईल असा दावा मोदींनी केला होता. तेव्हा देशाशी खोटं बोलणाऱ्या मोदींनी माफी मागावी. असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे.
दरम्यान, नोटाबंदीच्या काळात 2 कोटी 89 लाख कोटी रुपयांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या जवळपास 10 लाख जणांवर आयकर विभागाची सध्या नजर आहे. जवळपास 13 लाख बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
आरबीआयनं जाहीर केलेल्या आकडेवारीमुळं नोटाबंदीचा फुगा फुटल्याचं समजतं आहे. त्यानंतर केंद्रानं हे पाऊल उचललं आहे.
दुसरीकडे विकास दरात घसरण झाल्यानं मोदी सरकार आणखी अडचणीत आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या त्रैमासिकाच्या तुलनेत देशाच्या विकास दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
2016-17 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात देशाचा विकासदर 7.9 टक्के इतका होता तर चालू आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात विकासदर 5.7 टक्क्यापर्यंत घसरला आहे. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे. नोटाबंदीमुळं उत्पादन क्षेत्राला बसलेल्या फटक्यानंतर ही घसरण पाहायला मिळते आहे.
'नोटाबंदीसाठी मोदींनी देशाची माफी मागावी’, काँग्रेस आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2017 09:11 PM (IST)
आरबीआयनं जुन्या नोटांबाबतची आकडेवारी जाहीर केल्यानंतर नोटाबंदीचा फुगा फुटला आहे. त्यामुळे आता यावरुनच काँग्रेसनं मोदींवर जोरदार टीका सुरु केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -