मुंबई : कोलंबो वनडेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची '10' क्रमांकाची जर्सी घातल्यानं मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे.


या संपूर्ण प्रकारानंतर स्वत: शार्दूलनं याबाबत आपली बाजू मांडली आहे. एका मुलाखतीत त्यानं यामागची कहाणी सांगितली.

अंकगणितामुळे आपण हा क्रमांक निवडल्याचं त्यानं स्पष्ट केलं. शार्दूलनं सांगितलं की, त्याच्या जन्म तारखेची एकूण बेरीज ही 10 येते. त्यामुळे जर्सीसाठी 10 नंबर निवडला. शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला आहे.

अंकगणितानुसार जन्म तारखेची एकूण बेरीज (16+10+1991) 10 होते. जर्सीसाठी 10 क्रमांक निवडताना एवढा मोठा वाद होईल असं खुद्द शार्दूललाही वाटलं नव्हतं.

दरम्यान, या प्रकरणात हरभजन सिंहनं शार्दूलची पाठराखण केली आहे. 10 क्रमांकाची जर्सी घालून शार्दूलनं कोणतीही चूक केली नसल्याचं त्यानं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

सचिन तेंडुलकरची ‘10’ क्रमांकाची जर्सी शार्दूल ठाकूरला