मुंबई : आयपीएलच्या पहिल्याच मोसमात चॅम्पियन बनणाऱ्या राजस्थान रॉयल्सचं यंदा दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. राजस्थानने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिटेन केलं, तर अनेक दिग्गज खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असेल, हे अगोदरच स्पष्ट होतं. मात्र सपोर्ट स्टाफची घोषणा अद्याप झालेली नाही. संघाचे प्रशिक्षक, मेंटॉर यांच्या नावाबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हे सर्व प्रश्न समोर आलेले असतानाच एक नाव समोर आलं आहे.

माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न यांचं हे नाव आहे. शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वातच राजस्थानने पहिल्यांदा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. लवकरच आयपीएल 2018 मध्ये पुनरागमन करण्याचे संकेत शेन वॉर्न यांनी दिले आहेत.

राजस्थान रॉयल्स (एकूण खेळाडू -23)

  1. स्टीव्ह स्मिथ

  2. बेन स्टोक्स

  3. अजिंक्य रहाणे

  4. स्टुअर्ट बिन्नी

  5. संजू सॅमसन

  6. जॉस बटलर

  7. राहुल त्रिपाठी

  8. डीअर्सी शॉर्ट

  9. जोफ्रा आर्चर

  10. क्रिष्णप्पा गौतम

  11. धवल कुलकर्णी

  12. जयदेव उनाडकट

  13. अंकित शर्मा

  14. अनुरित सिंह

  15. झहीर खान

  16. श्रेयस गोपाल

  17. सुधासेन मिधुन

  18. प्रशांत चोप्रा

  19. बेन लाफलिन

  20. महिपाल लोमरोर

  21. जतिन सक्सेना

  22. आर्यमान बिर्ला

  23. दुष्मंथा चमिरा