मुंबई : रिटायरमेंटनंतर भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान शुभेच्छा दिल्या. शिवाय भारतीय खेळाडूंनीही गंभीरवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. गौतम गंभीरने सर्व फॉर्मेटमधून निवृती घेतली आहे. त्याने काल सोशल मीडियावर एक भावूक व्हीडिओ टाकून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व स्तरातून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
धन्यवाद कर्णधार


आयपीएलमध्ये शानदार कर्णधारपद भूषवल्याबद्दल धन्यवाद. तू एक खास व्यक्ती आहेस. तू नेहमी खुश राहावं हीच ईश्वराकडे प्रार्थना. तसेच तू नेहमी हसत रहा, अशा शब्दात बॉलिवूडच्या किंग खानने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गंभीरला शुभेच्छा दिल्या.


तूच खरा चॅम्पियन

"गौती तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तू खरा चॅम्पियन आहेस, जो देशासाठा लढला. तुला खूप खूप प्रेम," अशी शुभेच्छा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंह याने दिली आहे.


तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले

जलद गोलंदाज प्रविण कुमाने गंभीरच्या निवृतीच्या व्हीडिओचा उल्लेख करत तो म्हणाला, " हा खूपच प्रेरणा देणारा व्हीडीओ आहे. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही गौती भाई तुझ्याकडून खूप शिकायला मिळाले. धन्यवाद."


तुझी कारकीर्द शानदार होती

"तुझ्यासोबातच्या खूप आठवणी आहेत. आपण सोबत खूप क्रिकेट खेळलो. तू एक खरा योद्धा आहेस, तुझी कारकीर्द शानदार होती. भविष्यासाठी खूप शुभेच्छा," अशा शब्दात फिरकी गोलंदाज अमित मिश्राने गंभीरला शुभेच्छा दिल्या.


खेळाला खूप काही दिले

गोलदांज मुरली कार्तिकनेही गंभीरला शुभेच्छा दिल्या. "मी संध्याकाळपर्यंत तुझ्यासोबत होतो, मात्र तू कल्पना येऊ दिली नाही, की तु तु्झ्या जीवनातील इतका मोठा निर्णय घेतलास. तू नेहमी स्फूर्तीने खेळलास, तसेच तु खेळाला खूप काही दिलस, त्यासाठी तुझे आभार."


तुझ्या कारकिर्दीवर तुला अभिमान वाटायला पाहिजे

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने त्याच्या ट्वीटर हॅन्डलवर गंभीरला शुभेच्छा दिल्या. "मैदानावर तु ज्याप्रकारे खेळलास, त्या कारकिर्दवर तुला अभिमान वाटायला पहिजे. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. मला विश्वास आहे की तू पुढेही देशासाठी कार्य करत राहशील," असे लक्ष्मण म्हणाला.


विजयी खेळी करणारा खेळाडू

गोलंदाज इरफान पठानने गंभीरला शुभेच्छा देताना म्हणाला, की "गंभीर तु देशासाठी अनेक वेळा विजयी खेळी केली आहेस. मी आशा करतो की तुझी पुढील यात्रा मंगलमय राहील. हॅप्पी रिटायरमेंट मित्रा.