आफ्रिदीने नवं ट्विट करुन, आपल्या ‘त्या’ ट्विटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाही तर त्याने स्पष्टीकरणाच्या ट्विटमध्ये भारतीय तिरंग्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे.
आफ्रिदीचं स्पष्टीकरण
आफ्रिदीने म्हटलंय की, “आम्ही सर्वांचा सन्मान करतो. हा फोटो खऱ्या खेळाडूचं उदाहरण आहे. मात्र जेव्हा मानवाधिकाराचा मुद्दा येतो, तेव्हा तो आमच्या निरागस काश्मीरीयांनाही लागू व्हावा”
आफ्रिदीचं यापूर्वीचं ट्विट
आफ्रिदीने काल दुपारी ट्विट करुन काश्मीरमधील परिस्थितीसाठी भारताला जबाबदार धरलं होतं. शिवाय यूएन म्हणजे संयुक्त राष्ट्र याबाबतीत भारतावर काहीही कारवाई करत नाही, असंही तो बरळला.
भारतीय सैन्याने रविवारी 13 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, आफ्रिदीने हे ट्विट केलं होतं.
तो म्हणाला होता, “भारतव्याप्त काश्मीरची परिस्थिती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. इथे आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्या निष्पापांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? हा रत्कपात थांबवण्यासाठी ते पावलं का उचलत नाहीत?
गौतम गंभीरचं उत्तर
आफ्रिदीच्या या ट्विटनंतर टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने चोख उत्तर दिलं होतं.
''काही पत्रकारांनी आफ्रिदीच्या ट्वीटबद्दल प्रतिक्रिया विचारली. मात्र त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? आफ्रिदी ज्या यूएनबद्दल बोलतोय, त्याचा अर्थही त्याला माहित नाही. आफ्रिदीच्या शब्दकोशात यूएनचा अर्थ अंडर नाईन्टिन आहे, ज्याच्या पलिकडे त्याला काहीच माहित नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,'' असा टोला गंभीरने लगावला.
संबंधित बातमी
आफ्रिदीला फार सीरियस घेऊ नका : गंभीर