इस्लामाबाद : पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारण ठरलं आहे आफ्रिदीचं गेम चेंजर हे आत्मचरित्र. आफ्रिदीने या आत्मचरित्रात एक खुलासा केला आहे. आफ्रिदीने 37 चेंडूत ठोकलेल्या वेगवान शतकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी कनेक्शन असल्याचे त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.


आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने दिलेली बॅट वापरून त्याने 37 चेंडूत जगातलं सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. 1996 मध्ये कारकीर्दीतल्या केवळ दुसऱ्याच वन डे सामन्यात आफ्रिदीने हा पराक्रम गाजवला होता. त्या खेळीत आफ्रिदीने 40 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. या खेळीत सहा चौकार आणि तब्बल 11 षटकारांचा समावेश होता.

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, "सचिनने त्याची बॅट पाकिस्तनचा अष्टपैलू खेळाडू वकार युनिसला दिली होती. पाकिस्तानातल्या सियालकोटमध्ये चांगल्या बॅट तयार करून मिळतात. त्यामुळे सचिनला त्याच्या बॅटसारखीच बॅट तयार करुन हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी त्याने मला दिली. त्या बॅटने मी अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकलं."

वाचा : वयचोर आफ्रिदी, आत्मचरित्रात खऱ्या वयाचा खुलासा, कोडं सुटण्याऐवजी आणखीच गडद

विराटने कर्णधार म्हणून सुधारणा करण्याची गरज : आफ्रिदी