केपटाऊन : चेंडूशी छेडछाड करणं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगलंच महागात पडलं. कर्णधारपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात आली. तर त्याच्यासोबतच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही पदावरुन पायउतार झाला. यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनकडे संघाची धुरा देण्यात आली आहे.
चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.
बॉल टेम्परिंगचा प्लॅन कसा ठरला?
ऑस्ट्रेलिया संघाचं हे बॉल टेम्परिंग प्रकरण चुकीने झालेलं नाही. हा संघाच्या रणनितीचाच एक भाग होता हे खुद्द कर्णधारानेच मान्य केलं. सँडपेपरने बॉल घासण्याची जबाबदारी कॅमेरुन बेनक्रॉफ्टकडे देण्यात आली होती.
या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला
बॅनक्रॉफ्टने केलेलं संपूर्ण कृत्य टेलिव्हिजन कॅमेरात टिपलं गेलं. पुन्हा पुन्हा त्याच्यावरच कॅमेरा नेण्यात आला. त्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली.
हे दृष्य नंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमान यांनी पाहिलं. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोबतचा खेळाडू पीटर हँड्सकॉम्बला अलर्ट केलं.
प्रशिक्षकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब तातडीने मैदानाकडे धावताना दिसला आणि त्याने बॅनक्रॉफ्टला याबाबत माहिती दिली.
बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. ही घटना पुन्हा पुन्हा मैदानावरच्या स्क्रीनमध्ये प्ले करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 43 व्या षटकानंतर पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि निगेल लियाँग यांनी स्टीव्ह स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टशी घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. त्यानंतर चेंडू न बदलताच खेळ पुढे चालू ठेवण्यात आला.
अखेरच्या सत्रात स्टीव्ह स्मिथ जवळपास अर्धा तास ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. कदाचित, यापुढे काय करायचं याची तयारी तो करत असावा.
खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकरच संपवण्यात आला.
ऑस्ट्रेलिया संघाने यानंतर सर्व रेडिओ आणि टीव्हीच्या मुलाखती रद्द केल्या. त्याऐवजी स्टीव्ह स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चूक मान्य केली. शिवाय फायदा होण्यासाठी बॉल टेम्परिंग केल्याची कबुलीही दिली.
संबंधित बातम्या :
मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार?
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 10:33 AM (IST)
ऑस्ट्रेलिया संघाचं हे बॉल टेम्परिंग प्रकरण चुकीने झालेलं नाही. हा संघाच्या रणनितीचाच एक भाग होता हे खुद्द कर्णधारानेच मान्य केलं. सँडपेपरने बॉल घासण्याची जबाबदारी कॅमेरुन बेनक्रॉफ्टकडे देण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -