FIFA 2018 : सेनेगलच्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2018 12:00 AM (IST)
रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे.
मॉस्को : रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे. सेनेगलनं पोलंडचा २-१ असा पराभव करून, आपल्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात केली. या सामन्यात पोलंडच्या थियागो सिओनिकनं ३७व्या मिनिटाला स्वयंगोल करून सेनेगलचं खातं उघडलं. मग निआन्गनं ६०व्या मिनिटाला सेनेगलचा दुसरा गोल डागला. पोलंडच्या क्रायचोविआकनं ८६व्या मिनिटाला हेडरवर गोल करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. पण पोलंडला सेनेगलला बरोबरीत रोखण्यात अपयश आलं. दरम्यान फिफा विश्वचषकात बलाढ्य दक्षिण अमेरिकी संघाला हरवणारा जपान हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. जपाननं कोलंबियावर २-१ अशी मात करून, रशियातल्या विश्वचषकात विजयी सलामी दिली. संबंधित बातम्या :