श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी, अशी शिफारस करणारा अहवाल जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एनएन व्होरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होणं जवळपास निश्चित झालं आहे.


भाजप-पीडीपी सरकार कोसळलं!

जम्मू-काश्मीरमध्ये आज मोठा राजकीय भूकंप झाला. कारण भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युतीचं सरकार कोसळलं.



सत्तेतून बाहेर पडताना भाजपने काय कारणं दिली?

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, हिंसाचार वाढला असून, काश्मीर खोऱ्यातील नागरिकांचे मुलभूत अधिकार धोक्यात असल्याचं कारण देत भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढला. तशी घोषणा भाजपचे नेते राम माधव यांनी केली. आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह  यांच्यासोबत भाजप नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

रमजान महिन्याच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर भाजप आणि पीडीपीमधील तणाव कमालीचा वाढला होता. तसंच द रायझिंग काश्मीरचे संपादर शुजात बुखारी यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुनही भाजप आणि पीडीपीत मतभेद झाले होते.

संबंधित बातम्या :

भाजपने पाठिंबा काढला, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचं सरकार कोसळलं

देशद्रोही युती तुटली, आम्हाला आनंद आहे- संजय राऊत

काय आहे कलम 370? ते हटवल्यास काय होईल?

काय असतील जम्मू काश्मीरमध्ये राजकीय पर्याय?

पीडीपीचा पाठिंबा काढण्याआधी अजित डोभाल, अमित शाहांची चर्चा