कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोलकात्याजवळ त्याच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी गांगुलीने ट्रेनने प्रवास केला. मात्र या प्रवासात त्याची सहप्रवाशासोबत जागेवरुन शाब्दिक चकमक झाली.
गांगुली उत्तर बंगालमधील बालुरघाट इथे पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जाणार होता. त्याने पदातिक एक्स्प्रेसचं एसी प्रथम श्रेणीचं तिकीट बूक केलं होतं. मात्र त्याच्या जागेवर अगोदरच एक प्रवासी बसलेला होता.
गांगुलीने त्या व्यक्तीला जागा सोडण्यास सांगितलं तेव्हा त्याने जाग सोडण्यास नकार दिला आणि हुज्जत घातली. या वादानंतर ट्रेनमधून खाली उतरणं गांगुलीने योग्य समजलं. ज्यानंतर गांगुलीला एसी द्वितीय श्रेणीचं तिकीट देण्यात आलं. तांत्रिक कारणांमुळे हा गोंधळ झाल्याचं वृत्त आहे.
गांगुलीने यापूर्वी 2001 साली ट्रेनने प्रवास केला होता. कार्यक्रमात त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली. गांगुली सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्यही आहे.
गांगुलीचा 15 वर्षांनी ट्रेनने प्रवास, जागेवरुन प्रवाशाशी वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 11:00 AM (IST)
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोलकात्याजवळ त्याच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी गांगुलीने ट्रेनने प्रवास केला. मात्र या प्रवासात त्याची सहप्रवाशासोबत जागेवरुन शाब्दिक चकमक झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -