नवी दिल्ली: रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलंवहिलं पदक मिळवून देणारी कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचा रविवारी प्रियकर सत्यव्रत कादियानसोबत साखरपुडा संपन्न झाला.

सत्यव्रतचे वडील सत्यवान यांनी कुस्तीमध्ये अर्जुन पुरस्कार पटकावला आहे. त्यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की, 'हा घरगुती कार्यक्रम होता. फक्त दोघांच्या कुटुंबातील सदस्य त्यासाठी उपस्थित होते. हा सोहळा फारच छान झाला.'

सत्यव्रत 22 वर्षाचा असून तो साक्षीपासून दोन वर्षांनी लहान आहे. तो आपल्या वडिलांच्या मार्गदशर्नाखाली कुस्तीचं शिक्षण घेत आहे. 2010 साली त्यांनं यूथ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकही पटकावलं होतं. एका कुस्ती टुर्नांमेंटमध्ये दोघांची ओळख झाली होती.

सत्यव्रतबाबत साक्षीनं आधीचं सांगितलं होतं की, 'तो मला नेहमीच खूप सहकार्य करतो. माझ्या स्वप्नांना तो स्वत:ची स्वप्नं समजतो.'