राज्यातील २१४ नगरपालिका, नगरपरिषदांसाठी होणार निवडणूक



राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार



पुणे : माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरण : शेळके कुटुंबाचा आमरण उपोषण करण्याचा इशारा, मुख्य आरोपी श्याम दाभाडेला उद्यापर्यंत अटक करण्याची मागणी



--------------------------


पुणे: वानवडी येथे अजित पवारांच्या हस्ते महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना न बोलावल्याने भाजपचं आंदोलन

--------------------------

पुणे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

--------------------------

1 ब्रिक्सच्या मंचावरुन पंतप्रधान मोंदीचा पाकला इशारा, शेजारी देशाकडून दहशतवादाला खतपाणी, दहशतवादाविरोधात ब्रिक्स देशांना एकत्र लढण्याचं आवाहन

--------------------------

2 मराठा क्रांती मोर्चाचं वादळ मुंबईच्या वेशीवर, ठाण्यातल्या मोर्चाला तूफान गर्दी, तर चिपळूणच्या मोर्चानं कोकणातही मराठा एकजूट

--------------------------

3 अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी नांदेडमध्ये बहुजनांचा मोर्चा, अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीही एकवटले, मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर

--------------------------

4 आजपासून कापड बाजाराचा बेमुदत संप, कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्यानं मुंबई गुमास्ता युनियननं पुकारलं बंड

--------------------------

5 मुंबईतील रस्ते गुळगुळीत करण्याची डेडलाईन संपली, काम पूर्ण न करु शकलेल्या कंत्राटदारांवर पालिका आता काय कारवाई करणार.. याकडे लक्ष

--------------------------

6 पुण्यातल्या तळेगाव दाभाडेत दिवसाढवळ्या माजी नगराध्यक्षांची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, 3 जण ताब्यात

--------------------------

7 हाजी अली दर्गातील महिलांच्या प्रवेशावर सुप्रिम कोर्ट निकाल देणार.. तर बीसीसीआयमध्ये लोढा समीतीच्या शिफारशींवरही आज सुनावणी

--------------------------

8 अमेरिकेच्या कैरोलीनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षकार्यालयावर हल्ला, हिलरी क्लिन्टनच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा आरोप

--------------------------

9 धरमशालाच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाची विजयी सलामी, न्यूझीलंडचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी

--------------------------

एबीपी माझा वेब टीम