Saina Nehwal Corona Positive : भारताची फुलराणी सायना नेहवालला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. अशातच आता सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर 1000 टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 12 ते 17 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
याआधी लंडन ऑलिम्पिक (2012) ची कांस्यपदक विजेत्या सायनाने बीडब्ल्यूएफ द्वारे कोविड-19 प्रोटोकॉल अंतरग्त लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करत ट्वीट केलं होतं. सायनाने ट्वीट केलं की, "तपासणीमध्ये सर्व निगेटिव्ह आल्यानंतरही फिजियो आणि प्रशिक्षक आम्हाला भेटू शकत नाहीत? आम्ही चार आठवड्यांपर्यंत स्वतःला फिट कसे ठेवणार. आम्हाला चांगल्या परिस्थिती खेळायचं आहे. कृपया यावर मार्ग काढा."
थायलँडमध्ये आहे भारतीय टीम
भारताची संपूर्ण टीम बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सुपर 1000 स्पर्धेत भाग घेण्यासाठी थायलँडच्या राजधानीत आहे. सायनाने आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे की, "आम्हाला वॉर्म अप/ कूल डाउन /स्ट्रेचिंग / च्या माध्यमातून वेळ दिला जात नाही. आम्ही इथे जगभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबतच्या स्पर्धेबाबत बोलत आहोत." ते पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही फिजियो आणि ट्रेनर यांना इथे घेऊन येण्यासाठी खूप खर्च केला आहे. जर ते आमची मदद करु शकणार नाहीत, तर मग ही गोष्ट आम्हाला आधीच का सांगितली नाही?"
दरम्यान, एच.एस.प्रणय, पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा, ध्रुव कपिला, मनु अत्री हेदेखील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला पोहोचले आहेत. पारुपल्ली कश्यपने पत्नी सायनासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं होतं की, "बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर आम्ही थायलँड स्पर्धेतून खेळात वापसी करत आहोत. खूप उत्सुक आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IND Vs AUS | टीम इंडियाला धक्का; ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही बुमराह
- India vs Australia, Sydney Test Records: 41 वर्षांनंतर टीम इंडियाने चौथ्या डावात खेळल्या 110 ओव्हर्स; आणखी काही रेकॉर्ड्सची नोंद
- वयाच्या 10व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं, तरीही खेळला सामना; कोहलीशी मिळतीजुळीती विहारी हनुमाची कहाणी
- हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर, जाडेजाच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
- BLOG : ये ड्रॉ जीत के बराबर है..