रिओ दी जेनेरिओ: बॅडमिंटनपटून  सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू या भारताच्या स्टार्सनी रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे.

 

सायनानं साखळी फेरीच्या आपल्या पहिल्या लढतीत ब्राझिलच्या लोहायनी व्हिसेन्टवर 21-17, 21-17 अशी मात केली. तर पीव्ही सिंधूनं आपलं ऑलिम्पिकमधलं पदार्पण विजयानं साजरं केलं.
सिंधूनं महिला एकेरीच्या साखळी फेरीत पहिल्या सामन्यात हंगेरीच्या लॉरा सारोसीचा 21-8, 21-9 असा धुव्वा उडवला. आता 14 ऑगस्टला सिंधूला कॅनडाच्या मिशेल लीचा मुकाबला करायचाय तर सायनाची लढाई युक्रेनच्या मारिया युटिलिनीशी होईल.