कॅण्डी (श्रीलंका): विराट कोहलीच्या टीम इंडियानं गॉल आणि कोलंबो कसोटी सामन्यांपाठोपाठ श्रीलंका दौऱ्यातली कॅण्डी कसोटीही जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
भारतानं श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून, कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. भारतानं या विजयासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियानं परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
INDvsSL : भारताचा लंकेवर मालिका विजय, 85 वर्षांनी इतिहास रचला
दरम्यान, कॅण्डी कसोटीत आदल्या दिवशीच्या एक बाद 19 धावांवरून श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत आटोपला. भारताकडून रवीचंद्रन अश्विननं चार, मोहम्मद शमीनं तीन, उमेश यादवनं दोन आणि कुलदीप यादवनं एक विकेट काढली.
सचिन तेंडुलकरचं ट्वीट
दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करुन कोहली ब्रिगेडचं कौतुक केलं.
सचिन म्हणाला, “कसोटी मालिकेचा शेवट यापेक्षा उत्तम करण्याचा दुसरा मार्ग कोणता असू शकतो? जबरदस्त कामगिरीबद्दल संपूर्ण टीमला जादू की झप्पी. एकदिवसीय मालिकेसाठी शुभेच्छा”
https://twitter.com/sachin_rt/status/897026354109046786