नवी दिल्ली : एअरटेलने दिल्लीतील नितीन सेठी यांना जे बिल पाठवलं आहे, ते पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. एअरटेलने नितीन सेठी यांना 1 लाख 86 हजार 553 रुपयांचं बिल पाठवून ते तातडीने भरायला सांगितलं आहे.



इंडिया टुडे वेबसाईटच्या वृत्तानुसार नितीन सेठी यांचं हे बिल 8 जुलै 2017 रोजी जनरेट करण्यात आलं. ग्राहकाने 1 लाख 86 हजार 553 रुपयांची सेवा वापरली, तर याची क्रेडिट लिमिट 14 हजार रुपयांपर्यंत आहे, असं बिलामध्ये म्हटलं होतं.

नितीन सेठी यांनी फेसबुकवर हा प्रकार शेअर केला, ज्याची दखल एअरटेलकडून घेण्यात आली. तांत्रिक कारणामुळे ही चूक झाल्याचं कंपनीने मान्य केलं आणि दुरुस्त बिल दिलं.