मुंबई : भारतीय संघाची नवीन सेलिब्रेशन स्टाईल सध्या जोरदार चर्चेत आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने शतक नव्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. धवनने शतक ठोकल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने इशारा करत दोन्ही हात वर करुन व्ही- व्हिक्ट्रीचं चिन्हं दर्शवलं. त्या या स्टाईलला डॅडी दी पोज (Daddy D pose) असं नाव दिलं आहे.


कशी सुरु झाली ‘Daddy D’ pose?
धवन कायमच शतक ठोकल्यानंतर आपले दोन्ही हात उंच पसरुन अनोख्या अंदाजात आनंद साजरा करतो. कॅण्डीतील पल्लेकेल कसोटीत शतक केल्यानंतर त्याने V साईनची नवी स्टाईल सुरु केली. याआधी मिशी पिरगळून आनंद साजरा करत असल्याने त्याला गब्बर म्हटलं जात असे.


‘Daddy D’ सेलिब्रेशन पुढे कसं सुरु राहिलं?
कॅण्डी कसोटीचा दुसरा दिवस हार्दिक पंड्याने गाजवला. 96 चेंडूत 108 धावांची खेळी रचणाऱ्या पंड्याने एका षटकात 26 धाव केल्या. ज्या स्टाईलमध्ये धवनने शतकाचा आनंद साजरा केला, त्याच अंदाजात पंड्यानेही आपलं शतक साजरं केलं.

‘Daddy D’ पोज काय आहे?
टीम इंडियाच्या शिखर धवनने या स्टाईलला Daddy D pose नाव दिलं आहे. पल्लेकेल कसोटीच्या पहिल्या डावात 119 धावा केल्या. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्याला डॅडी डी नावाने ओळखलं जात असल्याचं समजलं. हे नाव त्याच्या आनंद साजरा करण्याच्या नव्या अंदाजाशी जोडलं जात आहे. आता ही स्टाईल ‘Daddy D’ pose नावाने ओखळली जाते.

https://twitter.com/klrahul11/status/896406290473156608

राहुल आणि पंड्याची भविष्यवाणी
शिखर धवन शतक ठोकणार याची भविष्यवाणी केएल राहुल आणि हार्दिक पंड्या केली होती आणि ती खरी ठरली. यानंतर दोघांनी सोशल मीडियावर त्याला डॅडी डी असं संबोधलं होतं. धवननेही ट्वीट करुन डॅडी डी म्हटल्यावर आनंद व्यक्त केला आणि पंड्याला शतकासाठी शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/SDhawan25/status/896772332034936832