मुंबई: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचं विधेयक बुधवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले.
त्यामुळे आता मंदिरात राज्यस्तरीय परिक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
पंढरपूर आणि शिर्डीतील मंदिराच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातही सरकारी पुजारी नेमावे यासाठी जनआंदोलन उभे राहिले होते. त्याला विधीमंडळात मंजुरी मिळाली.
ज्या पुजाऱ्यांची नियुक्ती होईल, त्यामध्ये 50 टक्के महिलांचा समावेश असेल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
मंजूर विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील. त्यामुळे पूजा करणाऱ्या व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होतील. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला 90 दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.
मंदिर विश्वस्तव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर हे या समितीचे पदसिदध सदस्य असतील.
दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करेल.
‘श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर’ अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
कोल्हापूरचा जावई अंबाबाई चरणी, झहीर-सागरिका देवीच्या दर्शनाला
बालाजीचा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला नेसवण्याची प्रथा बंद
अंबाबाई मंदिरात महिलांचा गोंधळ, पुजाऱ्याला बाहेर काढलं!
कोल्हापुरात चंद्रकांतदादांसमोरच अंबाबाईच्या श्रीपूजकाला मारहाण
अंबाबाईच्या गाभाऱ्यातून पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी, भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये झटापट