नालासोपारा : मुंबईतील नालासोपाऱ्यातून अपहरण करुन चिमुकलीची गुजरातमध्ये झालेली हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं आहे. हत्येप्रकरणी आरोपी अनिता वाघेराला अटक करण्यात आली आहे.

अनिता आणि संतोष या दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण आधीपासूनच विवाहित असलेला संतोष लग्नाचं आमिष दाखवून आपला गैरफायदा घेत असल्याची जाणीव अनिताला झाली. दोन वर्षात दोन वेळा झालेला गर्भपात आणि लग्नाचं स्वप्न भंगल्याचा राग मनात धरुन अनिताने संतोषची मुलगी अंजलीचं अपहरण केलं.

गुजरातमधल्या नवसारी रेल्वे स्थानकाच्या शौचालयात गळा दाबून अनिताने अंजलीची हत्या केली. या प्रकरणाचा तुळिंज पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आणि आरोपी अनिताला राहत्या घरातून अटक केली.
नालासोपाऱ्यात अपहृत चिमुरडीचा मृतदेह गुजरातमध्ये आढळला

नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर भागातील साई अर्पण अपार्टमेंट या सोसायटीच्या समोरुन शनिवारी तिचं अपहरण झालं होतं. आरोपी महिला अंजलीला घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाली होती.