PKBS Vs GT LIVE Score Updates: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो

PKBS Vs GT LIVE Score Updates:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात पंजाबचा संघ आज (शुक्रवारी, 8 एप्रिल) गुजरातशी भिडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Apr 2022 11:35 PM

पार्श्वभूमी

PKBS Vs GT LIVE Score Updates:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात पंजाबचा संघ आज (शुक्रवारी, 8 एप्रिल) गुजरातशी भिडणार आहे. मुंबईच्या बेब्रॉर्न स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. मयंक अग्रवालच्या...More

 PBKS Vs GT: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात गुजरातनं पंजाबला 6 विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजराजच्या संघानं पंजाबसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सामना पंजाबच्या बाजूनं झुकलेला दिसत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राहुल तेवतियानं अखेरच्या तीन चेंडूवर 13 धावा ठोकत गुजरातला विजय मिळवून दिलाय.