Sachin Tendulkar on Rishabh Pant : सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत (IND vs AUS) याने स्फोटक फलंदाजी करून चाहत्यांची मने जिंकली. पंतने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढली. पंतने भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. भारताकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पंतच्या नावावर आहे. 2022 साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत 28 चेंडूत अर्धशतक झळकावण्यात पंत यशस्वी ठरला होता.


ऋषभने केलेली 184 धावांच्या स्ट्राईक रेटने लक्षणीय 


सचिन इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला की, अधिकाधिक खेळपट्टीवर फलंदाज 50 किंवा त्याहून कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. ऋषभने केलेली 184 धावांच्या स्ट्राईक रेटने केलेली खेळी लक्षणीय आहे. त्याने पहिल्या बाॅलपासूनच ऑस्ट्रेलियाला चोपून काढले. त्याला फलंदाजी करताना पाहणे नेहमीच मनोरंजक असते. खरोखर त्याची खेळी छाप पाडणारी आहे.  विशेष म्हणजे चौथ्या कसोटीत आक्रमक बेजबाबदार फटका मारून सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला होता आणि मूर्ख असा उल्लेख केला होता. 






कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे भारतीय फलंदाज 



  • 28 चेंडू - ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, 2022

  • 29 चेंडू - ऋषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2025

  • 31 चेंडू - शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, 2021

  • 31 चेंडू - यशस्वी जैस्वाल वि BAN, 2024

  • 32 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड, 2008


गंभीरचा विक्रम मोडला 


सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पंत 33 चेंडूत 61 धावा करून बाद झाला होता. त्याने 61 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. पंतने प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा खास विक्रम मोडीत काढला. ऋषभ पंत आता त्याचे सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कसोटी धावांचा आकडा (1832) मायदेशाबाहेर मागे टाकण्यात यशस्वी झाला. पंतने आतापर्यंत भारताबाहेर 29 कसोटी सामने खेळले असून 1842 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, गौतम गंभीर यांनी भारताबाहेर कसोटीत एकूण 24 सामने खेळले आणि या काळात ते 1832 धावा करण्यात यशस्वी ठरले. गंभीरने भारताबाहेर कसोटीत 4 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. 


 रिषभ पंतने इतिहास रचला


दरम्यान, ऋषभ पंत कसोटीत 50+ स्कोअरमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. दुसऱ्या डावात त्याने 33 चेंडूत 61 धावा केल्या आणि 184.85 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.  


कसोटीत सर्वाधिक स्ट्राइक-रेटने ५०+ धावा करणारे भारतीय फलंदाज  



  • 184.84 - ऋषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, (2025), सिडनी

  • 161.81 - कपिल देव विरुद्ध इंग्लंड, 1982

  • 161.29 - ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, 2022

  • 158.33 - शार्दुल ठाकूर वि. इंग्लंड, 2021

  • 158.13 - केएल राहुल वि. बांगलादेश, 2024


पंतने व्हिव्हियन रिचर्ड्स यांची बरोबरी केली


त्याच वेळी, पंत देखील 150+ स्ट्राइक रेटसह कसोटीत सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या खेळाडूंच्या महान यादीत सामील झाला आहे. पंतने या बाबतीत महान व्हिव्हियन रिचर्ड्सची बरोबरी केली आहे.


कसोटी डावात सर्वाधिक वेळा 150+ SR सह 50+ स्कोअर


2 - व्हिव्ह रिचर्ड्स
2 - बेन स्टोक्स
2 - ऋषभ पंत


इतर महत्वाच्या बातम्या