Ind vs Aus 5th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये अनेक वेळा टीम इंडियाच्या आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कधी ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराज आमनेसामने आले तर कधी विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टासमधील वाद चर्चेत आला. सिडनीत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातील वातावरणही असेच होते. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात बाचाबाची झाली. आता या प्रकरणी रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार आहे, असे रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले आहे.


तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार...


सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टास आणि भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात बाचाबाची झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या लंच ब्रेकनंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रोहित शर्माला याबाबत विचारले असता, त्याने सडेतोड उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला, 'आमची पोर जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, तुम्ही बोट दाखवलं तर ते थोडे शांत बसणार आहे'.






बुमराह-कॉन्स्टासमध्ये नक्की काय झाला वाद?


ही संपूर्ण घटना पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. बुमराह ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसरे षटक आणि पहिल्या दिवसाच्या खेळातील शेवटचे षटक टाकत होता. ओव्हरचा पाचवा चेंडू टाकण्यासाठी बुमराह पळत आला, तेव्हा स्ट्राईकवर असलेला उस्मान ख्वाजा तयार नव्हता. पुन्हा एकदा बुमराह बॉल टाकण्यासाठी तयार झाला पण पुन्हा ख्वाजाला उशीर करत होता. मग बुमराह थोडा रागवला. दरम्यान, नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या सॅम कॉन्स्टासने कोणतेही कारण नसताना बुमराहला काहीतरी म्हणाला. त्यानंतर दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसले. यानंतर पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.






हा वाद इथेच थांबला नाही. यानंतर बुमराहने एक बॉल टाकला जो डॉट राहिला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर बुमराह आला आणि त्यावर त्याने ख्वाजाची विकेट घेतली. बुमराहने विकेट घेताच तो रागाने कॉन्स्टासकडे गेला आणि मग थांबला. यानंतर भारतीय खेळाडूंनीही कॉन्स्टाससमोर विकेटचा आनंद साजरा केला.


हे ही वाचा -


Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीदरम्यान बदलला कर्णधार, कोहलीला मिळाली टीम इंडियाची कमान, जाणून घ्या कारण