Wimbledon Carlos Alcaraz: वयाच्या 21व्या वर्षीच स्पेनच्या कार्लोस अल्काराझने दुसरे विम्बल्डन जेतेपद पटकावताना एकूण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. सर्वियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अल्काराझने दिमाखात विम्बल्डन जेतेपद उंचावले.
विम्बल्डन चषकात यंदा सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसनं जोकोविचला 6-2, 6-2, 7-5 नं पराभव केला. केवळ 21 व्या वर्षी त्यानं हे यश मिळवलंय. 24 वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या नोव्हाक जोकोविचला गतवर्षी झालेल्या विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्काराझनं पराभूत केले होते. यंदाही कार्लोस अल्काराझनं विम्बल्डनवर नाव कोरले. विम्बल्डनचे खिताब सलग दोन वेळा मिळवणारा इतिहासात तो केवळ तिसरा खेळाडू आहे. जोकोविच अनेकदा अल्कारााच्या वेगवान फटक्यांना परतावता आले नाही आणि यामुळे तो हतबलही झाला. पहिले दोन सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतरही जोकोविचने सुरुवातीच्या चार गुणांपर्यंत चांगली झुंज दिली. मात्र, यानंतर अल्काराझने मिळविलेली पकड न सोडता जोकोविचला चुका करण्यास भाग पाडले.
सचिन तेंडूलकडून अल्काराझला सलाम-
दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करून कार्लोस अल्काराझच्या विजयाचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला की, आतापासून टेनिसवर फक्त एकच राज्य करेल, तो म्हणजे अल्काराझ...विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्या प्रकारचा वेग, शक्ती, स्थान आणि उर्जेचा आगामी काळात कार्लोस अल्काराझला नक्कीच फायदा होईल, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
कोण आहे कार्लोस अल्काराझ ?
स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. त्याचा जन्म 5 मे 2003 मध्ये झाला. अल्कारेझचे वडील टेनिसचे धडे द्यायचे, त्यांच्या अॅकॅडमीमधूनच अल्कारेझनं टेनिसचे धडे गिरवले. त्यानं अनेक स्पॅनिश आणि युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. अल्काराझनं त्याचा पहिला एटीपी सामना रामोस विनोलास विरुद्ध जिंकला होता, तेव्हा अल्कारेझ अवघ्या 16 वर्षांचा होता. जगातील नंबर एकचा माजी खेळाडू जुआन कार्लोस फेरेरोचा ट्रेनर आहे. फरेरो 15 व्या वर्षापासूनच फेरेरोसोबत टेनिसचा सराव करत आहे.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'