Astrology 15 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज सोमवार, 15 जुलै रोजी चंद्र तूळ राशीत राहणार आहे. तसेच बुध आणि शुक्र कर्क राशीत असल्यामुळे लक्ष्मी नारायण योगाचा शुभ संयोगही तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असल्याने या दिवशी लक्ष्मी नारायण योगासोबत सिद्ध योग, रवियोग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. यानुसार आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज महादेवाच्या कृपेने मेष राशीचे लोक समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येईल. नोकरदार लोकांचा आजचा दिवस फायद्याचा असेल, तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी देखील मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. व्यापारी आज नफा मिळवण्यासाठी त्यांची विशेष कौशल्यं दाखवतील. कौटुंबिक जीवनात जर काही कलह चालू असेल तर तो वडीलधाऱ्यांच्या माध्यमातून संपेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील.
सिंह रास (Leo)
आज सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज पैसा कमावण्यात आणि बचत करण्यात यश मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याचा आणि सल्ल्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील. व्यवसायासाठी बनवलेल्या नवीन योजना तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळवून देतील. नोकरदारांना आज एक नवीन ऑफर मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तूळ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स आज वाढेल. लवकरच तुमच्याकडे मोठी रक्कम येईल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. आज तुम्ही उत्साही दिसाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. आज नोकरी करणारे आणि व्यावसायिक चांगलं काम करतील. तुमचं सोशल सर्कल वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांचा विकास पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत राहील आणि तुम्ही घरात काही शुभ कार्यक्रमाचं आयोजन देखील करू शकता.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. व्यवसायाशी संबंधित काही समस्या चालू असतील, तर त्या आज सुटतील. तुमची व्यवहारांवर चांगली पकड आणि नियंत्रण राहील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना लाभाच्या नवीन संधी मिळतील. खूप दिवसांनी तुम्हाला काही खास मित्रांना भेटण्याची आणि जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ असेल, भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. नोकरी आणि व्यावसायिक आज विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देणार नाहीत, ज्यामुळे भविष्यात यश तुमच्या पायाशी असेल.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना ज्या गोष्टींची चिंता होती ती आज महादेवाच्या कृपेने दूर होतील. व्यवसायात नवीन यश मिळेल आणि तुम्हाला चांगला नफा देखील मिळू शकेल, म्हणून तुमच्या परिश्रमात कोणतीही कमी ठेवू नका. शत्रू पूर्णपणे बलवान असतील, परंतु ते तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. जे लोक प्रेमात आहेत ते आज त्यांच्या प्रियकराबद्दल घरात सांगू शकतात. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही तुम्ही कठोर परिश्रम कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :