कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर किंग विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली.  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळला जात आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत क्रमांक-1 आणि क्रमांक-2 वर आहेत आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अशा स्थितीत या दोन्ही संघांमधील सामना अप्रतिम होणार होता. आजचा सामना टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी अधिक खास बनला जेव्हा या सामन्यातच विराट कोहलीने कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक झळकावले. या शतकासह विराटने वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.


49 वरून 50 पर्यंत पोहोचण्यासाठी मला 365 दिवस लागले


विराटने बरोबरी केल्यानंतर सचिनने ट्विट करून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 49 वरून 50 पर्यंत पोहोचण्यासाठी मला 365 दिवस लागले, नुकताच मी 50 वर पोहोचलो. पण मला खात्री आहे की तु लवकरच 49 ते 50 पर्यंत पोहोचशील. पुढील काही सामन्यांमध्ये तू माझा विक्रम मोडशील. अभिनंदन...  सचिन तेंडुलकरचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स मास्टर ब्लास्टरच्या ट्विटवर कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.






49व्या शतकानंतर विराट काय म्हणाला?


याशिवाय विराट 543 धावांसह या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची नाबाद खेळी खेळल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, "या संघातील माझे काम शेवटपर्यंत फलंदाजी करणे आहे. याबाबत संघाकडून स्पष्ट चर्चा झाली. मी क्रीजवरच राहीन आणि बाकीचे खेळाडू माझ्यासोबत फलंदाजी करत राहतील. याशिवाय विराट कोहलीला त्याच्या वाढदिवशी त्याच्या 49व्या शतकाबद्दल विचारले असता कोहली म्हणाला, "भारतासाठी खेळण्याची प्रत्येक संधी मोठी असते. माझ्या वाढदिवशी हे शतक करणे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. यासाठी मी देवाची ऋणी आहे की मला असा क्षण जगण्याची संधी मिळाली."


विराट कोहलीने 289 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विराट कोहलीने आपल्या वनडे करिअरमध्ये 13626 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची सरासरी 58.48 र त्याचा स्ट्राईक रेट 93.55 तसेच विराट कोहलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत 49 शतके झळकावली आहेत. याशिवाय पन्नास धावांचा आकडा 70 ळा पार केला आहे. त्याचबरोबर या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 8 सामन्यात 108.60 च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या