कोलकाता : ज्याची प्रतीक्षा होती, ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती, ज्याची हुरहुर लागून होती अशा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 49 व्या शतकाची नोंद बर्थडे मॅन किंग विराट कोहलीनं कोलकातामधील इडन गार्डन मैदानावर केली. या शतकासह किंग कोहलीनं क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता शतकांचे अर्धशतक याच वर्ल्डकपमध्ये पूर्ण करेल, अशी चाहत्यांना आशा आहे. 


बर्थडेला शतक झळकावण्याचा पराक्रम आतापर्यंत 6 फलंदाजांना करता आला आहे. कोहली त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये शतकाच्या जवळ आल्यावर कोहली बाद झाला. पण आज त्याने पराक्रम आपल्या नावावर केला. आम्ही तुम्हाला अशाच 6 फलंदाजांची ओळख करून देऊ ज्यांनी त्यांच्या वाढदिवशी शतक झळकावले.



मिचेल मार्श


ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिचेल मार्शचा वाढदिवस 20 ऑक्टोबर रोजी येतो. यंदाच्या विश्वचषकात त्याने आपल्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. मार्शने 121 धावांची शानदार खेळी केली होती.



टॉम लॅथम


न्यूझीलंडचा स्टार आणि अनुभवी फलंदाज टॉम लॅथमचा वाढदिवस 2 एप्रिल रोजी येतो. त्याने 2022 मध्ये नेदरलँडविरुद्ध जबरदस्त शतक झळकावले होते. लॅथमने नाबाद 140 धावांची शानदार खेळी केली होती.



रॉस टेलर


या यादीत न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरच्या नावाचाही समावेश आहे. 2011 मध्ये त्याच्या वाढदिवशी त्याने पाकिस्तानविरुद्ध 131 धावांची नाबाद खेळी खेळली होती. टेलरचा वाढदिवस 8 मार्च रोजी येतो.


सनथ जयसूर्या


श्रीलंकेचा माजी सलामीवीर आणि दिग्गज सनथ जयसूर्याने 2008 मध्ये त्याच्या वाढदिवशी बांगलादेशविरुद्ध 130 धावांचे शतक झळकावले होते. जयसूर्याचा वाढदिवस 30 जून रोजी येतो.



सचिन तेंडुलकर


दिग्गज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस २४ एप्रिल रोजी येतो. 1998 मध्ये त्याच्या वाढदिवशी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची अप्रतिम खेळी खेळली होती.



विनोद कांबळी


विनोद कांबिल यांचा वाढदिवस 18 जानेवारीला आहे. अशा स्थितीत त्याने 1993 मध्ये आपल्या वाढदिवशी श्रीलंकेविरुद्ध दमदार शतक झळकावले होते. त्याने 100 धावांची नाबाद खेळी खेळली.



इतर महत्वाच्या बातम्या