Rudranksh Patil : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने ईजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या (President cup) 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत याने सुवर्ण पदक जिंकत महाराष्ट्रासह भारताचा नाव मोठं केलं आहे. विशेष म्हणजे या कामगिरीमुळे जागतिक शुटर ऑफ द इअरसह गोल्डन टारगेटचा पहिला भारतीय मानकरी रुद्रांक्ष ठरला आहे. तसंच त्याला तब्बल 15000 डॉलरचे (जवळपास 12 लाख भारतीय रुपये) बक्षीस मिळाले आहे. रुद्रांक्ष हा मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे.

  


ईजिप्त देशाची राजधानी कैरो येथे प्रेसिडेंट कप (President cup) स्पर्धेचे सामने पार पडले. यावेळी भारतासाठी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत रुद्रांक्षने सुवर्ण पदक जिंकले. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या अव्वल 12 स्थानी असलेल्या नेमबाजांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय शुटिंग स्पेार्ट फेडरेशनने (ISSF) या स्पर्धेसाठी टॉप 12 नेमबाजांना निमंत्रीत करुन सदरची स्पर्धा आयोजित केली होती. 


रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीत 630.1 गुण मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. सेमी फायनलमध्ये ॲालंपिक विजेत्या खेळाडूंना मात देऊन त्याने सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवत फायनलमध्ये थाटात  प्रवेश केला. विशेष म्हणजे फायनलमध्ये त्याचा सामना पुन्हा एकदा ईटलीचा स्टार नेमबाजपटू डॅनिलो सोलार्जो याच्याशी झाला. डॅनिलो नुकत्याच झालेल्या जागतिक अजिक्यपद स्पर्धेतच्या फायनल्समध्ये रुद्रांक्ष चा प्रतिस्पर्धी होता. ज्यानंतर रुद्रांक्षने डॅनिलोवर 16/10 च्या फरकाने मात करत सुवर्णपदक मिळवलं.


रुद्रांक्षला कुटुंबाची साथ


देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटनं वेड लावलं असताना रुद्रांक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्वामध्ये रुद्रांक्षच्या परिवाराने त्याला खूप सपोर्ट केल्याचं समोर आलं आहे. रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे पालघर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आहे. तर आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. 


हे देखील वाचा-