या सामन्यात दिल्लीने दिलेलं 175 धावांचं लक्ष्य बंगळुरुने बारा चेंडू बाकी ठेऊन पार केलं. बंगलोरच्या एबी डिव्हिलियर्सने 39 चेंडूतल्या नाबाद 90 धावांच्या आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 30 धावांचं योगदान दिलं.
त्याआधी रिषभ पंतच्या 85 धावांच्या आक्रमक खेळीमुळे दिल्लीने पाच बाद 174 धावा उभारल्या होत्या. दिल्लीचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर युवा खेळाडू रिषभ पंतने एकाकी झुंज देत शानदार 85 धावांची खेळी केली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.