India vs Australia 2023 World Cup Final : वर्ल्डकपच्या इतिहासात चौथ्यांदा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली असून रविवारी 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाशी महामुकाबला होणार आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत एकही पराभव न स्वीकारता फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आणि मायदेशात दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया सुद्धा सहाव्यांदा विजेतेपदासाठी सज्ज आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचाचाही कॅप्टन असलेल्या हिटमॅन रोहितचा शर्माचा पिवळ्या जर्सीचा आणि विजेतेपदाचा अनेकवेळा संबंध आला आहे. त्यामुळे फायनलच्या सामन्यातही हिटमॅन ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी आव्हान वाटेल, असं वाटत नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या जर्सीला 2013 पासून पाचवेळा पराभूत केलं आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यांमधील दबाव सहररित्या पेलला आहे. दुसरीकडे, 2023 मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला. आयपीएलमध्ये 6000 हून अधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली आहे.
रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार
मुंबई हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ का आहे हे मुंबई इंडियन्सच्या 5 चमकदार आयपीएल ट्रॉफींमधून दिसून येते. MI चे नेतृत्व करताना, रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलच्या इतिहासात एक खेळाडू म्हणून सहा आयपीएल विजेतेपद जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. रोहितनंतर दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे, ज्याने चेन्नईचे नेतृत्व करताना 4 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
प्रत्येक मोसमात अर्धशतक
IPL ची सुरुवात 2008 साली झाली. रोहित सुरुवातीची काही वर्षे डेक्कन चार्जर्सचा भाग होता. खरं तर, आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळल्या गेलेल्या सर्व सत्रांमध्ये, रोहितने एका किंवा दुसर्या सामन्यात निश्चितपणे अर्धशतक झळकावले आहे. हा पराक्रम रोहितशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने केलेला नाही.
हिटमॅननची हॅट्ट्रिक
रोहित शर्माची झंझावाती फलंदाजी सर्वांनाच माहीत आहे, पण काही वर्षांपूर्वी रोहित शर्माही एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याने आयपीएलमध्ये हॅटट्रिकही केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या