पुणे : सेनापती जेव्हा समोरून लढून टीमला लढण्यास प्रेरणा देत असतो तेव्हा होणारी कामगिरी सर्वोत्तम असते. टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्मा सुद्धा याच रोलमध्ये विरोधी संघाची धुलाई करत आहे. त्याने आजही बांगलादेशविरुद्ध फटकेबाजी केली. भारताची पहिली विकेट 88 धावांवर पडली. कॅप्टन रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. त्याने 40 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या.






हसन महमूदच्या चेंडूवर तो तौहीद हृदोयकरवी झेलबाद झाला. पॉवरप्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने शानदार फलंदाजी केली. रोहित शर्मा दुर्दैवाने 48 धावांवर बाद झाला, पण त्याने या 48 धावांच्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. 






नजर टाकूया त्याच्या 48 धावांच्या खेळीतील विक्रमांवर 



  • विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला

  • आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा.

  • कर्णधार (पूर्ण सदस्य) म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार

  • आशिया खंडात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण केल्या

  • रोहित शर्मा विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू






विश्वचषकात सर्वाधिक धावा



  • सचिन - 2278 (44 डाव)

  • पाँटिंग - 1743 (42 डाव)

  • संगकारा - 1532 (35 डाव)

  • रोहित - 1226* (21 डाव)


दुसरीकडे, शुभमन गिलने 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. मात्र, तो 53 धावांवर बाद झाला. गिलने खराब चेंडूंवर मोठे फटकेही मारले. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीही शानदार फलंदाजी करत असून टीम इंडिया वेगाने लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. कोहलीने या डावात झंझावाती सुरुवात केली. हसन महमूदच्या नो बॉल्सचा त्याला फायदा झाला. कोहलीने पहिल्या चार चेंडूत 13 धावा केल्या.






प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून 256 धावा केल्या. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 66 धावा केल्या. तर तनजीद हसनने 51 धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने 46 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. मुशफिकुर रहीमने 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या