पुणे : भारत आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषकातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा विश्वचषकातील हा चौथा सामना आहे, पण सलामीवीर शुभमन गिलचा हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.


शुभमन गिलचा सिक्सचा डबल बार अन् सारा तेंडुलकरची कळी हळूच खुलली! 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या.  भारताच्या डावाची सुरवात शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. दोघांनी तुफानी फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी 12.4  षटकांत 88 धावांची सलामी दिली. रोहित 48 धावांवर बाद झाला. 






तत्पूर्वी, शुभमन गिलने 10 व्या षटकात नसूम अहमदला सलग दोन षटकार ठोकले. यावेळी सारा तेंडुलकरने जोरदार टाळ्यांनी दाद दिली. तत्पूर्वी, शुभमन गिलच्या कॅचनंतर सारा तेंडुलकरचे फोटोज व्हायरल झाले होते. ज्यामध्ये सारा खूप आनंदी दिसत होती. गिलच्या झेलनंतर साराच्या आनंदाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. व्हायरल रिअॅक्शनमध्ये सारा तेंडुलकर हसत टाळ्या वाजवताना दिसते. 






गिलच्या झेलवर साराने आनंदाने उडी मारली


गिलने डावाच्या 38व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तौहीद हृदयाचा झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. शार्दुलने ओव्हर शॉर्टचा दुसरा चेंडू टाकला, जो फलंदाजाने लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत गेला आणि थेट शुभमन गिलच्या हातात गेला.






नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर लिटन दासने 66 धावांची (82 चेंडू) सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात ७ चौकारांचा समावेश होता. याशिवाय सहकारी सलामीवीर तनजीद हसनने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 (43 चेंडू) धावा केल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 


इतर महत्वाच्या बातम्या