मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध विजय साजरा केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मैदानावरच कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाचा केक कापून जबरदस्त सेलिब्रेशन केलं.

 
हरभजन सिंग, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड यांच्यासह अन्य खेळाडूंनी मैदानावर केक कापून चांगलीच धमाल केली. रोहितच्या चेहऱ्यावर केक फासून टीममेट्सनी रो'हिट' सेलिब्रेशन केलं. क्रिकेटपटूंच्या या मौजमजेचा व्हिडिओ फेसबुकसह सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
रोहित शर्माने नुकतंच 30 व्या वर्षात पदार्पण केलं. यावेळी पंजाब विरुद्ध 79 धावांची दमदार खेळी त्याने केली होती.

 

 

रोहित शर्माच्या हस्ताक्षरातील एक पत्रही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही साथ दिलीत, त्याबद्दल आभार, असं त्याने पत्रात म्हटलं आहे.

 



 

 

पाहा व्हिडिओ :