हनिमूनला सलमानला सोबत नेणार : बिपाशा बसू
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2016 05:14 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडची बंगाली ब्यूटी, अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हर शनिवारी एका शानदार सोहळ्यात विवाहबंधनात अडकले. रात्री मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. पंजाबी आणि बंगाली पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान संजय दत्त, आर. माधवन, सोनम कपूर, यांसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज या दिमाखदार सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान लग्नानंतर बोलताना सलमान आणि बिपाशा एकमेकांची विकेट घेत होते. 'सलमान खान आमच्या लग्नात आला, यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. मी सलमानची मैत्रिण आहे, मला सलमानचं लग्न व्हावं असं वाटत नाही. तो जगातील प्रत्येक मुलीशी चांगला वागतो. त्याने लग्न करावं, करु नये, त्याने खुश राहावं.' अशा भावना बिपाशाने व्यक्त केल्या. यावर उत्तर देताना 'बिपाशा-करणची जोडी चांगली आहे. मी आशा करतो ही जोडी टिकून राहील. हे महत्त्वाचं आहे' असा टोमणा सलमानने मारला. त्यानंतर बिपाशाने सलमान आमच्यासोबत हनिमूनला येणार आहे, असं सागितल्यावर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. ऐका बिपाशाचं 'ते' वक्तव्य :