मुंबई : दिल्लीचा युवा खेळाडू रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाल्याचं शानदार सेलिब्रेशन केलं. डी वाय पाटील टी ट्वेंटीचषकात त्याने वादळी इनिंग खेळून सर्वांची मनं जिंकली.


रिलायंन्स वनकडून खेळताना पंतने पाच षट्कार आणि दोन चौकारांच्या मदतीने 14 चेंडूत तुफानी 43 धावा ठोकत टाटा स्पोर्ट क्लबवर तीन विकेटने विजय मिळण्यात महत्वाची भूमिका निभावली.

छोटा पॅक, बडा धमाका, रिषभ पंतची दिमाखात एण्ट्री


टीम इंडियातील पंतचा सहकारी हार्दिक पंड्यानेही या सामन्यात 28 चेंडूत दोन षट्कार आणि एका चौकाराच्या मदतीने 36 धावा केल्या.

कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा


टाटा स्पोर्ट क्लबने 5 विकेटच्या मोबदल्यात रिलायन्स वनला 149 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र रिलायन्स वनने पंतच्या शानदार खेळीच्या जोरावर या सामन्यात विजय मिळवला.