चंदीगड : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहचं तीन वर्षानंतर संघात कमबॅक झाल्यानतंर त्याचे वडिल योगराज सिंह खुश आहेत. आपण दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की धोनी जाताच युवीचं संघात कमबॅक होईल, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा धोनीला लक्ष्य केलं आहे.

कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा


 

दैनिक भास्करसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याअगोदरही धोनीमुळेच युवीला संघात स्थान मिळत नसल्याचं सांगत त्यांनी धोनीवर टीका केली होती.

नवीन वर्ष युवीसाठी लकी, वनडे, टी-20 संघात पुनरागमन


 

इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी युवराजची टीम इंडियात निवड झाली आहे. युवराज सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला आता त्याच्या फलंदाजीने उत्तर द्यावं लागेल, असंही योगराज सिंह म्हणाले.

वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार


 

युवराजने 2013 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे खेळला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 टी ट्वेंटी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र रणजीतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा टीम इंडियात आपली जागा निश्चित केली आहे.

कोहलीच्या नेतृत्त्वात धोनी कोणत्या क्रमांकावर खेळणार?


 

महेंद्र सिंह धोनीने वन डे मालिकेसाठी संघ निवडीअगोदरच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे वन डे आणि टी ट्वेंटीच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.