मुंबई : यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आणि जलदगती गोलंदाज नवदीप सैनी यांना भारताने आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत ठेवलं आहे. मात्र 15 सदस्यीय मुख्य संघात एखादा खेळाडू दुखापत किंवा इतर कारणामुळे खेळू शकला नाही तरच या तीन खेळाडूंपैकी कोणाला तरी खेळण्याची संधी मिळेल.

इंग्लंडमध्ये 30 मे पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पंत आणि रायुडू यांना 15 सदस्यीय संघात जागा न मिळाल्याने संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. पंतला संघाबाहेर ठेवल्याने सुनील गावसकर यांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं. तर गौतम गंभीरनेही रायुडूला संधी न दिल्याने प्रश्न उपस्थित केले होते.

आयसीसीने संभाव्य खेळाडू निवडण्याची प्रक्रिया संपवली आहे. मात्र बीसीसीआयकडे या तीन खेळाडूंशिवाय इतर कोणालाही निवडण्याचा पर्यायही असेल, पण असं होण्याची शक्यता फारच कमी आहे.

VIDEO | विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड 



बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच, आमच्याकडे तीन स्टँडबाय खेळाडू असतील. रिषभ पंत आणि अंबाती रायुडू अनुक्रमे पहला आणि दुसरा स्टँडबाय असतील तर सैनी या यादीत गोलंदाजाच्या रुपात सामील आहे. खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चाहर हे नेट गोलंदाजांच्या रुपात संघाच्या सोबत जातील.

"संघ व्यवस्थापनाला आवश्यक भासली तर यांना संघात सामील केलं जाऊ शकतं. टीमसोबत जाणाऱ्या रिझर्व खेळाडूंमध्ये सैनीचाही समावेश आहे. "खलील, आवेश आणि दीपक स्टँड बाय नाहीत. गोलंदाजांच्या बाबतीत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे, पण फलंदाजामध्ये रिषभ किंवा रायुडू असेल," असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यो-यो चाचणी होण्याची शक्यता कमी
दरम्यान, विश्वचषकासाठी जाणाऱ्या संघातील खेळाडूंची यो-यो चाचणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण आयपीएल 12 मे रोजी संपणार आहे. खेळाडू व्यस्त टी20 सत्रात खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर त्यांना व्यस्त शेड्यूलमधून बाहेर पडण्यासाठी काही वेळ हवा आहे. खेळाडू थकलेला असल्यास त्याचा परिणाम वेगळा असू शकतो," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

World Cup 2019 : मी तर धोनीचा 'फर्स्ट एड किट' : दिनेश कार्तिक

टीम इंडियातील 15 जणांसोबत 'हे' चार क्रिकेटपटूही विश्वचषक दौऱ्यावर

वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर चार तासांत रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा जाहीर

टीम इंडियाची निवड करणाऱ्यांनी स्वत: किती क्रिकेट खेळलंय... वाचा

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड