मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दक्षिण मुबंईचे उमेदवार आणि मुंबईचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबईकरांना मालमत्ता कर न भरण्याचं आवाहन केलं. शिवसेनेने मालमत्ता कर माफ करु असं आश्वासन देत मुंबईकरांचा फसवणूक केली असल्याचा आरोप मिलिंद देवरांनी केला आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीतील जाहीरनाम्यात शिवसेनेनं मालमत्ता कर रद्द करु, असं आश्वासन दिलं होतं. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही मुंबईत मालमत्ता कर रद्द करुन असं, आश्वासन दिलं होतं. अशारीतीने 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी जागेत राहणाऱ्या मुंबईकरांना युतीने मालमत्ता कर माफीचं फक्त स्वप्न दाखवलं, मात्र अमंलबजावणी केली नाही, असा आरोप मिलिंद देवरांनी केला.


युतीने दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला. त्यानुसार फक्त सामन्य कर रद्द होणार आहे. शिवसेना-भाजपने संपूर्ण मालमत्ता कर रद्द करु असं म्हटलं, पण फक्त 11% कर रद्द केला. त्यामुळे मालमत्ता करमाफी हा देखील 'जुमला' होता, हे समोर आलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेनं घोषणा केली मग दोन वर्षे का अंमलबजावणी केली नाही? असा सवाल मिलिंद देवरांनी उपस्थि केला.


युती सरकारने मुंबईकरांना मुर्ख बनवलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्ही एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरु नका, असं आवाहन मिलिंद देवरांना केलं. तसेच काँग्रेस तुमच्या सोबत असल्याचंही देवांना सांगितलं.