अल्जेरियाच्या अब्देलतीफ बाकाने पुरुषांच्या 1500 मीटर ची टी13 श्रेणीची शर्यत 3 मिनिटं 48.29 सेकंदांत पूर्ण केली. ही विक्रमी वेळ नोंदवणाऱ्या बाकाने इथियोपियाचा तमिरु डेमिस, केनियाचा हेन्री किरवा आणि भाऊ (अल्जेरिया) फौद बाकाला मागे टाकलं.
महत्त्वाची बाब म्हणजे दृष्टीदोष असलेल्या स्पर्धकांच्या या शर्यतीतील या चारही खेळाडूंनी रियो ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर रेस धावणाऱ्या धावपटूला लागलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण केली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा धावपटू मॅथ्यू सँट्रोवित्झ ज्युनियरने 1500 मीटर धावण्याची शर्यत 3 मिनिटं 50 सेकंदात पूर्ण केली होती. ही वेळ पॅरालिम्पिकमधील 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानी असलेल्या फौद बाकाच्या तुलनेतही (3 मिनिटं 49.59 सेकंद) जास्त आहे.