मुंबई : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



काही दिवसांपूर्वीच या सिनेमाबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी अभिनेता सुशांतसिंह रजपूतला सिनेमाविषयी माहिती विचारताना दिसला होता.

 


या सिनेमात सुशांत सिंह रजपूतसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. नीरज पांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात धोनीचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.

पाहा ट्रेलर :



 

छोट्या शहरातील एका मुलाने क्रिडाजगतावर राज्य करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. सुशांतसिंह रजपूत याने आपल्या अभिनयाने खराखुरा धोनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.